Pankaja Munde: भाजपची खेळी यशस्वी! पंकजा मुंडे पुन्हा बनल्या आमदार, चाणक्यनीतीचा विजय?

Vidhan Parishad Election : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSakal
Updated on

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या अखेर आमदार झाल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना हा मोठा दिलासा मिळाला आहे. पंकजा मुंडे यांना २६ मतं मिळाली.

Pankaja Munde
MLC Election Result: पुण्यात भाजपची ताकद वाढली, विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर विजयी!

या निवडणुकीत भाजपचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचा विजय झाला आहे. त्यामुळं हे सर्वजण आता आमदार बनले आहेत.

Pankaja Munde
Smriti Irani Trolled: मुहब्बत की दुकान! राहुल गांधींनी स्मृती इराणींसाठी कार्यकर्त्यांना केलं खास आवाहन

पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या बहिण माजी खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या, अतिशय आनंदाची आणि स्वप्नपूर्तीची भावना आहे. अनेक दिवसांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. पंकजा ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाचा हा विजय आहे.

याप्रसंगी ज्या पाच युवकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं नसतं तर बरं झालं असतं असं त्यांनी म्हटलं. यावेळी प्रितम मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.