Vidhan Sabha Election 2024 Marathi News : राज्यात पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. पण यंदाची निवडणूक विविध कारणांमुळं अत्यंत अनिश्चित अशी असणार आहे. यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि आता तिसरी आघाडी अशी चर्चा होऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंबाबत ते म्हणाले, "जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला हवं, आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे.
तसंच ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा सुरु आहे. दररोज पूजा खेडकर यांच्याबाबत नवीन धक्कादायक खुलासे होत आहे. याप्रकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "कुणी कायदा मोडला असेल तर कोर्ट त्याबाबत बघेल, कुणीही यावरुन भूमिका घेण्याची गरज नाही.
दरम्यान, विधानसभेसाठी चर्चा सुरु असलेल्या तिसऱ्या आघाडीबाबतही यावेळी आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहेत तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही" म्हणजेच अजित पवार जर महायुतीतून बाहेर पडले तरच तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं त्यांनी सुचवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.