भर दुपारी ते दोघे कंपनीच्या कार्यालयात शिरले.. Rahul Narwekar यांचं नाव घेताच कर्मचारी 'अलर्ट'; विधानसभा अध्यक्ष थेट पोलिस ठाण्यात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न थोडक्यात टळला आहे. आमदारांना परदेश वारी घडवण्याचं कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलंय, त्या कंपनीला फसवण्याचा प्रयत्न झाला.
Rahul Narvekar
Rahul Narvekaresakal
Updated on

मुंबईः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न थोडक्यात टळला आहे. आमदारांना परदेश वारी घडवण्याचं कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलंय, त्या कंपनीला फसवण्याचा प्रयत्न झाला. ही बाबा त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आली. नंतर राहुल नार्वेकर यांनीही पोलिसात धाव घेतली आहे.

Rahul Narvekar News vidhan sabha

नेमकं घडलं काय?

विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना परदेश वारी घडवण्याचे कंत्राट एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीच्या कार्यालयात भर दुपारी ३ वाजता दोन व्यक्ती गेले. या दोन्ही आरोपींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशांची मागणी केली.

ते दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नार्वेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून देत बनावही केला. फोनवरुन एका तोतया इसमाने नार्वेकर यांच्या नावाने कर्मचाऱ्याशी बातचित केली. मात्र हे नाटक फारकाळ टिकलं नाही.

Rahul Narvekar
Jitan Ram Manjhi : बिहारमध्ये पुन्हा बदलणार मुख्यमंत्री? काँग्रेसने रचला नवा डाव, कोण आहे नवा किंगमेकर

याचदरम्यान, संशय आल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सावध होत प्रकरण समजून घेतले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्या दोन ठगांना पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्यास धमकी देऊन तिथून पळ काढला.

हा सर्व प्रकार राहुल नार्वेकर यांना कळाल्यानंतर त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. स्वीय सहाय्यकाकडून नार्वेकरांनी तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.