Rahul Narvekar: भरत गोगावलेच पुन्हा? शिवसेनेच्या व्हीपचा निर्णय काय घेणार नार्वेकरांनी दिला अंदाज

सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल आता विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर सोपवला
Rahul Narvekar
Rahul NarvekarEsakal
Updated on

सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल आता विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर सोपवला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. ते आज मुंबईत परतले आहेत. मुंबईत दाखल होताच त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला यावेळी बोलताना म्हणाले की, सर्व तरतुदी यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे. ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण झाल्या की निर्णय समोर येईल असंही ते म्हणालेत.

हा निर्णय घेण्यासाठी कसलीही घाई होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाबीनुसार हा निर्णय घेतला जाईल किंवा विनाकारण विलंब होणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं की, विधानसभा अध्यक्षांवर दबाव निर्माण केला जात आहे. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, सभागृहाच्या बाहेर केलेल्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. मी त्याकडे लक्ष देत नाही. कायद्याच्या तरतुदी नुसार निकाल घेतला जाईल.

Rahul Narvekar
Crime News: अनैतिक संबंध अन् पत्नीनेच पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा; १७ दिवसांनंतर घटनेचा उलगडा

पुढे ते म्हणाले की, 'मी कोणाच्या मनाप्रमाणे व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जातील. कोणाला वाटतं असेल लवकर निर्णय यावा म्हणून आम्ही निर्णय देऊ शकत नाही. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर लगेच निर्णय येईल. विनाकारण विलंब होणार नाही, 10वं शेड्यूल लक्षात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत.

Rahul Narvekar
Narhari Zirwal: 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची ठाकरे गटाला लागली गडबड, झिरवाळांना निवेदन

'मी आरोपांना घाबरून निर्णय घेणार नाही, निर्णय काय घेणार ही आताच सांगणार नाही. आमदार अपात्रतेबाबत योग्य तोच निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले आहेत. तर भरत गोगवले यांच्यावर बोलताना म्हणाले की,'भरत गोगवले यांच्याबद्दल कोर्टाने म्हंटले आहे की, त्यांची निवड कायमची अयोग्य नाही, त्यांची पुन्हा निवड होऊ शकते. सुनील प्रभू की भरत गोगवले यापैकी कोणती व्यक्ती व्हीप बजवण्यासाठी अधिकृत होती. यापासून सुरवात होणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानेही निर्णय दिला आहे', असंही ते म्हणाले आहेत.

योग्य त्या वेळेत निर्णय येईल. तर भरत गोगवले यांची निवड कायमची अयोग्य असेल असे सुप्रीम कोर्टाने म्हंटले नाही तर ते नव्याने प्रतोद होऊ शकते असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

Rahul Narvekar
Eknath Shinde: महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला? CM शिंदे भाजप नेत्यांच्या पाया पडल्यावर विरोधकांची टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()