Vidhanparishad Result : ‘महायुती’चा जलवा..! विधानपरिषदेच्या नऊ जागांवर विजय; ‘मविआ’ला केवळ दोनच जागा

विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने लढविलेल्या सर्व नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला (मविआ) आज मोठा धक्का दिला.
Vidhanparishad Winner Candidates
Vidhanparishad Winner Candidatessakal
Updated on

विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने लढविलेल्या सर्व नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला (मविआ) आज मोठा धक्का दिला. या निवडणुकीत ‘मविआ’ला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणात महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला असला तरी विधानसभेतील आमदारांच्या बळावर लढल्या जाणाऱ्या निवडणुकीत मात्र महायुती सरस ठरली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव व ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत ‘शेकाप’चे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या एकीला यामुळे तडा जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसची ६ मते फुटल्याचे दिसून येते. महायुतीकडे १९६ मते होती मात्र त्यांनी २१५ मते मिळविली, महाविकास आघाडीकडे ६५ मते होती त्यांना केवळ ५९ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी विजयी झाले.

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे या पहिल्या पसंतीची २६ मते घेऊन निवडून आल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचेही विधानपरिषदेत पुनर्वसन झाले आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी असा प्रयत्न दोन्ही आघाड्यांकडून सुरुवातीला करण्यात आला. विधानसभेचे सध्याचे संख्याबळ २७४ आहे त्यामुळे विजयासाठी २३ चा कोटा निश्चित करण्यात आला होता.

पक्षीय बलाबल

  • महायुती - १९६

  • महाविकास आघाडी - ६५

भाजपचे संख्याबळ

१०३ + ७ एकूण : ११०

५ अपक्ष - (रवी राणा, प्रकाश आवाडे, विनोद अग्रवाल, महेश बालदी, राजेंद्र राऊत) रत्नाकर गुट्टे (रासप) आणि विनय कोरे (जनसुराज्य)

शिंदे गटाचे संख्याबळ

३८ + ६ अपक्ष - ४४

६ अपक्ष - आशिष जैस्वाल, मंजुळा गावित, राजेंद्र यड्रावकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर आणि किशोर जोरगेवार

अजित पवार गटाचे संख्याबळ

४० + २ अपक्ष : ४२

२ अपक्ष - संजय शिंदे, चंद्रकांत पाटील

विजयी उमेदवार व मते

  • महायुती - ९

  • महाविकास आघाडी - २

भाजप - ५

  • पंकजा मुंडे - २६

  • परिणय फुके - २६

  • योगेश टिळेकर - २६

  • अमित गोरखे - २६

  • सदाभाऊ खोत - १५

(दुसऱ्या पसंती क्रमांकाने विजयी)

शिवसेना - २

  • भावना गवळी - २४

  • कृपाल तुमाने - २५

राष्ट्रवादी काँग्रेस - २

  • राजेश विटेकर - २३

  • शिवाजीरावर गर्जे - २४

काँग्रेस - १

  • प्रज्ञा सातव - २५

शिवसेना - १

  • (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद नार्वेकर - २२ (दुसऱ्या पसंती क्रमांकाने विजयी)

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट पुरस्कृत) जयंत पाटील (शेकाप) - १२ ( पराभूत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.