मुंबई - पालघर आणि मीरा भाईंदरपुरती मर्यदित असलेली बहुजन विकास आघाडी अगदी आता थेट राज्याच्या राजकारणात उतरणार असून, तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. लोकसभेला एकला चलो असलेला हा पक्ष तिसऱ्या नंबरला फेकला गेला होता. त्यामुळे विधानसभेला महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी एका आघाडीबरोबर हा पक्ष जाईल असे वाटत होते. परंतु आता मात्र ह्या पक्षाने थेट विधानसभेत वेगवेगळ्या भागातून आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केल्याने त्याचा फटका कोणाला बसतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण हि वाढत आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. असे असले तरी आतापर्यंत आपल्या ताकदीवर ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर वर्चस्व ठेवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने मात्र आतापर्यंत आपले अस्तित्व वेगळे जपले होते.
कोणत्या एका आघाडी किंवा युतीबरोबर न गेल्याने त्याचा त्यांना फटका हि निवडणुकीत बसला असला तरी त्यांनी आतापर्यंत थेट निवडणुकीपूर्वी कोणत्या हि आघाडी किंवा युतीतर्फे निवडणूक लढविण्याचे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यातील निवडणुकीत बहुजन विकास आघाडी वेगवेगळ्या भागातून जवळपास ५० जागा लढविणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, नगर, विदर्भ, सातारा आदी भागातून आपले उमेदवार उभे करणार असल्याचे आघाडीच्या माध्यमातून समजते.
याबाबत बहुजन विकास आघाडीच्या सूत्रांनी सांगितले कि, गेल्या कित्येक वर्षा पासून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उमेदवारीसाठी साकडे घालण्यात येत होते. त्याला आता मुहूर्त मिळाला आहे. राज्याच्या निवडणुकीत मचे उमेदवार हे निवडूनयेणारे आहेत. त्यामुळे महायुती आणि आघाडी दोन्हीकडे खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.