Maharashra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे-अजित पवार गटांना मिळणार अवघ्या १२० जागा? भाजप...

भाजपचा २०० जागा जिंकण्याचा मानस
ajit pawar eknath shinde and narendra modi
ajit pawar eknath shinde and narendra modisakal
Updated on

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे उद्दीष्ट समोर ठेवून भाजप जोरदार तयारीला लागली आहे. अशावेळी भाजपने ५१ टक्के मते आणि ३५०च्या आसपास जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठरविले आहे. यासाठीच खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मैदानात उतरले असून ते भाजप आणि मित्रपक्षातील खासदारांच्या बैठका घेणार आहेत. (PM Modi in action for upcoming lokshaba eletions)

याअंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधील एनडीएच्या खासदारांना भेटणार आहेत. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात तीन ऑगस्टला ही बैठक होऊ शकते, असे म्हटले जात आहे (PM Modi meets MP)

ajit pawar eknath shinde and narendra modi
Pune News : पुणेकरांना खड्ड्यात घालण्यास हे आहेत जबाबदार!

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ५१ टक्के मते मिळविण्याचे आणि ३४० ते ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आखले आहे. नुकत्याच झालेल्या ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या बैठकीनंतर आता एनडीएच्या सर्व खासदारांशी देखील पंतप्रधान मोदी चर्चा करणार असून तयारीचा आढावा घेतील. यासाठी खासदारांचे राज्यनिहाय दहा समूह तयार करण्यात येणार असून एकेका समुहात ३५ ते ४० खासदारांचा समावेश असेल. या समुहांशी पंतप्रधान मोदी बातचित करतील.(BJP Wants To Win 350 Seats in India )

तर दुसरीकडे महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेमध्ये २०० हून अधिक जागा जिंकण्याचा मानस भाजपचा आहे. यासाठीच त्यासाठी भाजपने सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा प्रमुख आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा प्रमुखांची नियुक्ती केली आहे.(200 Seats in maharastra for bjp )

ajit pawar eknath shinde and narendra modi
Manipur Voilance : PM मोदीं अन् स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी; दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्पष्टचं बोलल्या...

महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला तर राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी असे ३ पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. अश्यावेळी जर भाजपाला राज्यात २०० जागा जिंकायच्या असतील तर इतर दोन पक्षांना भाजप १२० जागा लढवण्यासाठी देईल असे म्हटले जात आहे. (120 sets for ajit Pawar and ekanth shinde )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.