Ramdas Athawale : विधानसभेत दहा ते बारा जागा मिळाव्यात

‘लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal
Updated on

पुणे - ‘लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला १० ते १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे,’ असे रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पक्षाला विधान परिषदेची एक जागा मिळावी, अशी विनंती केली होती. ती मान्य झाली नाही. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा, महामंडळांच्या नियुक्त्या करतानाही पक्षाला विचारात घ्यावे’ संविधानाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चालणार नाही, असेही ते म्हणाले.

ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत आठवले म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला तर आमचं मंत्रालय त्यावर विचार करेल.’

खेडकर प्रकरणी चौकशी व्हावी

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते अत्यंत गैर आहे. त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यात जर त्या दोषी आढळल्या तर त्यांना पदावरून हटविले पाहिजे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.