Uday Samant : उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळविण्याची चिंता

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी की युती करावी हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे.
Uday Samant vs Uddhav Thackeray
Uday Samant vs Uddhav Thackerayesakal
Updated on

नागपूर - उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी की युती करावी हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकते, त्यामुळे कदाचित २८८ मतदारसंघांमध्ये आपल्याला उमेदवार मिळतील की नाही याची चिंता असल्यामुळे ते चाचपणी करत असतील. मात्र, त्यांच्याजवळ कार्यकर्ते नसल्यामुळे आघाडीशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातील सूरजागड इस्पात प्रकल्पाच्या भूमिपूजनसाठी आले असता त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी २८८ जागांची चाचपणी केली जाते असेल तर उद्धव ठाकरे यांच्या मनात स्वबळावरसुद्धा लढायचे विचार सुरू असावे, अशी शंकाही व्यक्त केली. मात्र तो त्यांचा निर्णय आहे. आपण त्यात कशाला पडायचे असेही ते म्हणाले.

शेकापचे जयंत पाटील पराभूत झाल्याने कोणी महायुतीला मतदान केले याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील मत फुटणार असे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या नेत्याला संपविण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले.

आरक्षणावरून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये याकरिता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी भेटीत काय चर्चा झाली हे स्पष्ट केले आहे. यावरून ते नाराज आहेत, महायुतीला सोडचिठ्ठी देणार असा तर्क लावणे चुकीचे आहे. ते कुठेही जाणार नाहीत.

सूरजागड प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक असा आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठीसुद्धा तितक्यात महत्त्वाचा आहे. दावोस करारावर टीका केली जात होती. त्याला एक प्रकारचे उत्तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत आहे. गडचिरोली नक्षलवादी जिल्हा अशी ओळख असलेली पुसून उद्योग नगरी करण्याचा हा प्रयत्न आहे.

गडचिरोलीसाठी धर्मराव बाबा आत्राम यांचे मोठे योगदान आहे. १० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. गडचिरोलीमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोकांना काम मिळेल. उद्योगांमध्ये स्थानिक लोकांना रोजगार द्यावा असा कायदा नाही. मात्र ज्या गावात, ज्या विभागात प्रकल्प येतो तेथील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे तसा नियम असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती, म्हणून ते मागणी करत होते. पण अप्रेंटेनशिप बारावीनंतर ट्रेनिंग घ्यायचा असेल तर सहा हजार रुपये, डिप्लोमानंतर आठ हजार, पदवी प्राप्त नंतर १२ हजार रुपये अशी ती योजना असल्याचे सामंत म्हणाले. रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांच्या लोकसभा निवडणुकीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. जो काही निकाल देईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नंतर ते बघू असेही

- उदय सामंत, ऊर्जामंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com