विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाचे कामकाज गुरुवारी अवघ्या अर्ध्या तासात स्थगित करण्यात आले. लोकसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांचे राजीनामे मंजूर करण्यासह तालिका अध्यक्षांची निवड आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अहवाल सादर झाल्यानंतर, कामकाज स्थगित करत असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.विधानसभा सदस्य नीलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, संदीपान भुमरे, रवींद्र वायकर, वर्षा गायकवाड आणि राजू पारवे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यापूर्वी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा नार्वेकर यांच्याकडे दिला होता.
पारवे वगळता सर्व सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत. या सर्वांचेच राजीनामे मंजूर केले असल्याचे नार्वेकर यांनी सभागृहामध्ये जाहीर केले. अध्यादेशानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल (२०२३-२४) पटलावर ठेवला. हा अहवाल सादर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले.
सभागृहाच्या पटलावर
मुख्यमंत्र्यांच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांचा नगर विकास विभागाकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा अध्यादेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश
शोक प्रस्ताव
आमदार पी. एन. पाटील सडोलीकर, प्रतापराव भोसले, मीनाक्षी पाटील, गंगाधर गाडे , त्र्यंबक कांबळे, दगडू गलंडे, विश्वास गांगुर्डे, गंगाराम ठक्करवाड या आजी-माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला.
तालिका अध्यक्ष निवड
नार्वेकर यांनी विधानसभेच्या कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची निवड केली. यात कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट ,अमिन पटेल , किरण लहामटे आणि समाधान आवताडे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.