Vidya Chavan on Chitra Wagh: "माझ्या सुनेच्या प्रकरणाला दिलं वेगळं वळण..!" विद्या चव्हाणांनी ऐकवला चित्रा वाघ यांचा ऑडिओ, फडणविसांवर केले मोठे आरोप

Vidya Chavan on Chitra Wagh Political Update: पत्रकार परिषदेत विद्या चव्हाण यांनी आपली सून आणि चित्र वाघ यांच्यातील संभाषणाची ऐकवली ऑडिओ क्लीप.
chitra wagh criticized to vidya chavan
chitra wagh criticized to vidya chavaneSakal
Updated on

मुंबई : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला माझ्याविरोधात भडकवलं, असा सनसनाटी आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप ऐकवली. कालच विद्या चव्हाण यांनी आपण उद्या पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकणार असल्याचं म्हटलं होतं.

chitra wagh criticized to vidya chavan
Shiv Sena MLA Disqualification: आमदार अपात्रतेचा विषय उद्धव ठाकरेंनी दिला सोडून? सुप्रीम कोर्टाला लगावला खोचक टोला

विद्या चव्हाण म्हणाल्या, "माझ्या घरगुती प्रकरणाचा यांनी राजकारणासाठी वापर केला. महाले, अळवणी, मनिषा चौधरी यांच्यामार्फत राजकारण केलं गेलं. मी फडणवीस यांना भेटून सांगितलं या‌ न्यायालयीन प्रकरणात येऊ नका, पण त्यांनी हे केलं.

chitra wagh criticized to vidya chavan
Amol Mitkari on Devendra Fadanvis : व्याघ्र दिनानिमित्त फडणवीसांनी केलेलं ट्विट म्हणजे दुटप्पीपणा, मिटकरींची टीका

माझ्यावर ईडी, आयटीची धाडी टाकता येत नाही. मला अटक करता येत नाही. मी बेरोजागरी, महागाईविरोधात बोलते म्हणून मला असा त्रास दिला जात आहे. भाजपनं माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघ यांनी लक्षात ठेवावं हे त्यांच्या घरातही होऊ शकतं. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं याची दखल घ्यावी, अशी मागणीही यावेळी विद्या चव्हाण यांनी केली.

chitra wagh criticized to vidya chavan
Economic Survey 2023 : शिक्षणावरील वाढलेला खर्च, बेरोजगारीत घट, जाणून घ्या काय आहे आर्थिक सर्वेक्षणात?

विद्या चव्हाण यांनी ऑडिओ क्लीप ऐकवल्यानंतर चित्रा वाघ यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाणांनी सुनेवर कसा अन्याय केला हे सांगितलं. पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगत विद्या चव्हाण यांनी म्हटलं की, "चित्रा वाघ धडधडीत खोटं बोलत आहेत. त्यांनी माझ्याशी चर्चा करावी माझ्या सुनेला घेऊन यावं. माझ्या घरचा पत्ता तिला माहिती आहे. ती चुकीची माहिती देत आहे. कोर्टानं सांगितलेलं आहे की कौटुंबिक हिंसाचाऱ्यांची घटना नाही,"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.