मुंबई : महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार बोलायला तयार नाही. महागाईबाबत मोदी सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी महागाईवरुन (Inflation) आंदोलने करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाकिटमार मोदी सरकार असा घणाघाती टीका केली. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी आज सोमवारी (ता.चार) ट्विट करुन मोदी सरकारला महागाईवरुन टोला लगावला आहे. (Vidya Chavan Say, Petrol Diesel Price Hikes, Is This Acche Din Of Modi Government)
त्या म्हणतात, इंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग ! मोदी सरकारचे हेच का ते अच्छे दिन असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. सातत्याने वाढत्या गॅस दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मोदी सरकारने या सामान्य नागरिकांचा आर्थिक परिस्थितीचा विचार करावा. (Petrol Diesel Price)
युपीए सरकारच्या (UPA Government) काळात इंधन दरवाढ झाली की रस्त्यावर गॅस सिलिंडर घेऊन बसणारे, आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे लपून बसले आहेत ?, असा सवाल विद्या चव्हाण यांनी भाजपला केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.