DGP Badge : विजय चौधरी, संतोष सुबाळकर यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते.
vijay chaudhary and santosh subalkar
vijay chaudhary and santosh subalkarsakal
Updated on

पुणे - ट्रिपल महाराष्ट्र केसरी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय चौधरी आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागातील पोलिस निरीक्षक संतोष सुबाळकर यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह शुक्रवारी जाहीर झाले.

चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पुणे विभागात आहेत.

हिंद केसरी पै रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जात असलेल्या जागतिक पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत नुकतेच चौधरी यांनी १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले होते.

सुबाळकर यांनी गेली १९ वर्षे पोलिस खात्यात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्‍याच्या (२६ - ११) तपासात ते सहाय्यक होते आणि दहशतवादी अजमल कसाब, अबू जुंदाल विरुद्ध महत्त्वपूर्ण साक्ष दिली. गडचिरोलीतील नक्षलप्रवण क्षेत्रातही त्यांनी अनेक नक्षल कॅंप नष्ट केले.

गेल्या सात वर्षांपासून ते दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खालीस्तानी चळवळ, एलईटी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आदी संघटनांतील देशविघातक प्रवृत्तींना अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकात कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.