मुरगूड (कोल्हापूर) : भाजपला (BJP) पाच जागा देण्याचे गौडबंगालच आहे, दररोज भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) आठ दहा-दिवस मात्र गप्प का आहेत?,असा सवाल उपस्थित करुन आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)लावलेली ईडीची चौकशी बंद करा, असे मंत्री मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा (Chandrkant Patil)यांचे साटेलोटे झाल्याची शक्यता आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे विजय देवणे (Viajy Devane) यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आठ दहा-दिवस मात्र गप्प का आहेत?
मुरगूड (ता.कागल) येथे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या कागल तालुक्यातील ठरावधारक सभासदांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर, जि. प. सदस्या शिवानी भोसले, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, बाबासाहेब देवकर, विश्वास कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक ही कायमच कागल तालुक्याच्या अस्मितेची ठरली आहे. शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद लक्षात घेता आम्ही तीन जागांची मागणी केली होती. एक जागा जादा मागितली यात काय चुकलं? आम्हाला जर पँनेल करायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीच मोर्चेबांधणी केली असती.
सुरेश कुऱ्हाडे म्हणाले,एका बाजूला नेत्यांना बसायला कमी पडतयं,तर दुसरीकडे स्वाभिमानी जनता घेवून आम्ही लढतोय. उत्तम कांबळे म्हणाले, आघाडीचे नेते काहींचा पँनेलमध्ये घेवून तर काहीचा पँनेलच्या बाहेर ठेवून करेक्ट कार्यक्रम करण्याच्या नादात होते.अतुल जोशी यांचेही भाषण झाले.यावेळी बिद्रीच्या आनंदा पाटील यांनी श्री. मंडलिक यांना नोटांचा हार घातला.
विजय भोसले यांनी स्वागत केले. राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले. सुहास खराडे यांनी आभार मानले. क्रांतीसिंह पोवार - पाटील, लतिका शिंदे, रेखा कुऱ्हाडे, आर.डी. पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रकाश पाटील, दत्ता सोनाळकर, शिवाजी इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीचा संदर्भ देताना खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) म्हणाले, मुश्रीफ यांच्याकडे आठ संचालक होते. मी नववा गेलो. मला बोलवायला बाबासाहेब आसुर्लेकर हेच आले होते. मी गेलो आणि मग मुश्रीफ चेअरमन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.