Vijay Wadettivar: वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी! CM शिंदेंना पत्र लिहून केली 'ही' मागणी

काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जरांगेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar
devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar
Updated on

नवी दिल्ली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकारामुळं त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली आहे. एएनआयनं याबाबत माहिती दिली आहे. (Vijay Wadettivar death threat written letter to CM Eknath Shinde and demanded increase personal security)

devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar
Hyderabad Fire: गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळं संपूर्ण अपार्टमेंट पेटलं; 9 रहिवाशांचा होरपळून मृत्यू

कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार

माध्यमांतील वृत्तानुसार, विजय वडेट्टीवार यांना गेल्या काही दिवसांपासून फोनवरुन मेसेजच्या स्वरुपात धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर कुठलंही भाष्य करण्यास नकार दिला. पण मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. एबीपी माझानं आपल्या वृत्तात हा उल्लेख केला आहे. (Marathi Tajya Batmya)

devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar
Ajit Pawar: "अजितदादांना भाजपच्या तिकीटावर लढावं लागणार"; काँग्रेसचा हल्लाबोल

सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

या पत्रामध्ये त्यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली आहे. पण अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या विनंतीवर काय कार्यवाही केली हे कळू शकलेलं नाही. (Latest Marathi News)

devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar
Eknath Shinde: "महाराष्ट्राचे अल्लाबक्ष भाजपच्या प्रचाराला, त्यांची आखरी मंजील..."; CM शिंदेंवर ठाकरे गटाची बोचरी टीका

धमक्या कशामुळं?

गेल्या काही दिवसांपासून वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविषयी काही विधानं केली होती. त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. याद्वारे ते मराठा तरुणांची दिशाभूल करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर त्यांना धमक्या आल्या आहेत. पण धमक्या देणारे अज्ञात आहेत त्यांची माहिती आपल्याला नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.