"...म्हणून राज्यात गायी कापून खा, गोमुत्र शिंपडा असा कार्यक्रम सुरु झालाए"; वडेट्टीवार भडकले

संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर सभा स्थळावर गोमुत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्याचा अघोरी प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
vijay wadettivar
vijay wadettivarvijay wadettivar
Updated on

मुंबई : संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर सभा स्थळावर गोमुत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्याचा अघोरी प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

vijay wadettivar
Roshani Shinde: रोशनी शिंदेंना मारहाण झालीच नाही, मीडियासाठी बाऊ केला; शिवसेनेचं स्पष्टीकरण

वडेट्टीवार म्हणाले, "महाराष्ट्रात त्यांची जी यात्रा निघतेय त्याला प्रतिसाद मिळत नाहीए. त्यामुळं आता गायी कापून खा आणि गोमुत्र शिंपडत जा असा नवा फंडा त्यांनी सुरु केला असेल. जेव्हा सत्ता जाण्याची भीती असते तेव्हा असे प्रयोग केले जातात. पायाखालची वाळू घसरायला लागते तेव्हा बुद्धीला काही कळत नाही. तेव्हा त्यांना गोमुत्र, गाय, सावरकर आठवतील. पण लोकांच्या डोक्यात फिट्ट आहे की दहा महिन्यापासून राज्यात जे काही चाललंय ते योग्य नाही"

vijay wadettivar
Rahul Gandhi: राहुल गांधी ठाम! पण काँग्रेस नेता म्हणतो माफी मागाच; काय प्रकार आहे वाचा

सुप्रीम कोर्टानं सरकारला नपुंसक म्हणावं यापेक्षा दुसरी चपराक काय असू शकते. खरंतर त्यांच्यावरच आता गोमुत्र शिंपडण्याची पाळी आता आली आहे, असंही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर दिली प्रतिक्रिया

आमच्यामध्ये कोणाची खुर्ची मोठी, कोणाची लहान हे आम्ही ठरवू, विरोधकांनी हे ठरवण्याची गरज नाही. आमच्या कुठल्या नेत्यानं जर असं काही बोललं असतं तर तो खरा प्रश्न असता. उलट आम्ही आज पाहतोय की, मुख्यमंत्री मोठे आहेत की उपमुख्यमंत्री मोठे आहेत. त्यामुळं यावर अधिक काही बोलण्याची गरज मला वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.