Vijay Wadettiwar : नऊ मंत्री तर जाणारच, आधी मुश्रीफांची हकालपट्टी करा; वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwaresakal
Updated on

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तसेच इतर नऊ मंत्र्यांबद्दल देखील वडेट्टीवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लँड्रींग प्रकरणात कोर्टाने महत्वाचे निरीक्षण नोंदवलं, यानंतर वडेट्टीवारांनी मुश्रीफांचा राजीनामा घेण्याची मागणी केली, सोबतच इतर नऊ मंत्र्यांची देखील मंत्रीमंडळातीन हकालपट्टी करावी लागणार असल्याचा दावा केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्याबाबत पीएमएलए कोर्टाने अत्यंत गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे. साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं कोर्टाच्या निरीक्षणातून स्पष्ट झालं आहे. सरकारला शेतकऱ्यांसदर्भात शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar
Telangana Minister : पुष्पगुच्छ देण्यास उशीर, मंत्र्यांनी सर्वांसमोर अंगरक्षकाला लगावली कानाखाली; व्हिडीओ व्हायरल

तसेच पुढच्या १०-१२ दिवसांत या मंत्रिमंडळातील नऊ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तरी त्यांना शुद्ध करून, त्यांच्यावर गौमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला. पण हे दाग जरा जिद्दी आहेत, निघतच नाहीत अशी या मंत्र्याची स्थिती झाली आहे.

हे नऊ मंत्री कोण? याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मी या नऊ मंत्र्यांची नावे सांगू शकत नाही पण मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील हे मी तुम्हला खात्रीपुर्वक सांगतो असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

तसेच या नेत्यांवर आम्ही आरोप केलेले नाहीत, या मंत्र्यांवर भाजप नेत्यांनीच लावलेले आरोप आहेत. त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या तक्रारी आहेत असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या ओजस देवतळेने तिरंदाजीत जिंकले सुवर्णपदक ; अभिषेक वर्माला रौप्य !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.