Vijay Wadettiwar On Budget: पक्ष फोडण्यासाठी देखील वेगळ्या निधीची तरतूद पाहिजे होती; वडेट्टीवारांचा बजेटवरून टोला

Vijay Wadettiwar On Budget:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.
Vijay Wadettiwar On Budget
Vijay Wadettiwar On Budgetesakal
Updated on

Vijay Wadettiwar On Budget : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.

अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

दरम्यान विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत. याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या या बजेटमध्ये काहीही दिसलं नाही. महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला. परंतू त्यात ठोस असं काहीही दिसलं नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारकडून होत आहे. हे आता सिद्ध झालं आहे. हे तीनही मंडळी आता स्फेशल निधी पक्षफोडीसाठी ठेवतील. पक्ष फोडण्यासाठी ठोस तरतूद असेल. यांनी सर्व तरतुदी केल्या. महाराष्ट्र उधळ्याचा विडा उचलला असेल तर यासारखा दुर्दैवी बजेट दुसरा कोणता असू शकत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar On Budget
Maharashtra Budget 2024: औंधमध्ये एम्स!अजितदादांच्या बजेटमध्ये पुण्यासाठी घोषणांचा पाऊस, रिंगरोडसाठी केली खास तरतूद

शेतकरी, शिक्षण, शेतमजूर, बेरोजगार, महिलांवरचे अत्याच्यार वाढत आहेत. मात्र यासाठी काहीही केलं नाही. शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद नाही. केवळ सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाट थोपटून घेण्यासाठी फक्त स्मारक अन् स्मारकासाठी निधी हेच त्यांचा उद्देश आहे. यातून मते मिळवणे, हेच सरकारने केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. (Latest Marathi News)

वडेट्टीवार म्हणाले,  राज्य कर्जबाजारी झालं आहे. कर्ज काढून घर चालवल्या जात आहे, मिळकतीच्या भरवश्यावर नाही. आम्ही राज्य उभं केलं. मात्र पुन्हा त्या राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम सुरु आहे. ही तूट भरून काढण्यासाठी लोकांना महागाईला सामोरं जावं लागेल अन् सरकार विकासाचं गाजर दाखवणार. निवडणूक झाली की लोकांची लूट सुरु होईल.

Vijay Wadettiwar On Budget
Maharashtra Budget 2024 : आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू बनणार करोडपती! अजित पवारांची बजेटमध्ये मोठी घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.