Assembly Winter Session : 'फक्त टाईमपास करून वेळ मारून न्यायची...'; हिवाळी अधिवेशनाच्या कालवधीवरून विरोधकांची नाराजी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार आहे
devendra fadnavis eknath shinde ajit pawar
devendra fadnavis eknath shinde ajit pawarEsakal
Updated on

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार आहे.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. सात डिसेंबरला सुरू होणारे हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विरोधीपक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यांनी ठरवल्याप्रमाणे सात तारखेलाच अधिवेशनाची सुरूवात होत आहे. एकूण वर्किंग डेज १० होत आहेत. आमची मागणी होती की, किमान तीन आठवडे अधिवेशन नागपूरला चालावं, महाराष्ट्रात अनेक मोठे प्रश्न आहेत, त्यावर चर्चा करायची होती.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Ind vs Aus : 'आम्हीसुद्धा माणसे आहोत, यंत्र नाही...' वर्ल्ड कपनंतर लगेचच टी-20 मालिका खेळवण्यावर कर्णधार संतापला

शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी, रुग्णालये इत्यांदीचे प्रश्न आहेत. राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा करायची होती. विविध प्रश्नासाठी शसकीय, अशासकीय कामकाज, विनियोजन बिल, अंतिम आठवडा आणि पुरवण्यावर चर्चेसाठी दहा दिवस अपूरा वेळ आहे.

आम्ही तीन आठवड्याचा आग्रह धरला, पण या सरकारने त्यातून पळ काढला आहे. आता १० दिवसांचंच कामकाज ठरवलं आहे. आमचा आग्रह हा १५ दिवसांसाठी होता पण सरकार याबद्दल गंभीर नाही असेही विजय वडेट्टीवर म्हणाले.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Uttarkashi Tunnel Rescue: अंघोळ, जेवण,टॉयलेट...बोगद्यात अडकल्या नंतरचे ते १७ दिवस कसे होते? मजूरांनी सांगितली आपबिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.