Vijay Wadettiwar: शर्यत अजून जिंकलो नाही कारण... विजय वडेट्टीवारांना लोकसभेची फायनल जिंकण्याचा विश्वास

Vijay Wadettiwar: देशात आज छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक 2023 साठी मतमोजणी सुरू आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSakal
Updated on

Vijay Wadettiwar: देशात आज छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक 2023 साठी मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तीन राज्यात भाजपची आघाडी पाहून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पक्षाचे कार्यकर्ते ढोल वाजवून नाचत आहेत.

भाजपचा विजय होत असल्याचे पक्ष समर्थकांचे म्हणणे आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार होते, मात्र आता भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसत आहे. मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळवण्यात यश आलं. मात्र, राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसला गमवावी लागण्याची शक्यता आहे. या निवडणूक निकालावर राज्यातील नेते मत व्यक्त करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की लोकसभेची फायनल आम्हीच जिंकणार आहोत.

Vijay Wadettiwar
Chhattisgarh Election Result: मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे काय चुकले? काँग्रेसच्या पिछाडीची 'ही' आहेत 10 कारणे

तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाने जीवाचं रान केलं. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं आहे. आजच्या निकालातून ते स्पष्टपणे दिसतंय, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar: ..ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ! तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर अजित पवारांकडून मोदींवर स्तुतीसुमनं

भाजपावर टिका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे सरकार जनतेला आता नको आहे. काँग्रेसने सर्व जाती धर्मला एकत्र घेतले. द्वेषाचे राजकारण इथे चालत नाही. इथे देशाचे राजकारण चालते. समाजात धर्मात विष पेरण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.