Refinery Project : रिफायनरीविरोधातलं आंदोलन चिघळलं; स्थानिक ग्रामस्थ आक्रमक, राऊत पोलिसांच्या ताब्यात

बारसू इथं रिफायनरी प्रकल्पासाठी (Refinery Project) भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
Refinery Project Barsu Ratnagiri
Refinery Project Barsu Ratnagiriesakal
Updated on

राजापूर : तालुक्यातील बारसू (Barsu) इथं रिफायनरीविरोधात (Refinery) मोर्चा काढण्याची तयारी करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बारसूनजीक रानतळे इथं ही कारवाई करण्यात आली आहे. बारसू इथं रिफायनरी प्रकल्पासाठी (Refinery Project) भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Refinery Project Barsu Ratnagiri
Refinery Project Barsu Ratnagiri

मंगळवारी काम सुरू होताना पहिल्या दिवशी झालेल्या रस्त्यावरील आंदोलनानंतर ग्रामस्थ केवळ ठिय्या करत होते. खासदार राऊत यांनी दिलेल्या भेटीनंतर आता या आंदोलनानं पुन्हा उचल घेतली आहे.

Refinery Project Barsu Ratnagiri
Refinery Project Barsu Ratnagiri

आज शुक्रवारी बारसू इथं मोर्चा काढण्याची तयारी झाली होती. यासाठी खासदार राऊत, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख सदा सरवणकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रानतळे इथं एकत्र झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळं घटनास्थळी आग लागली आहे.

Refinery Project Barsu Ratnagiri
Refinery Project Barsu Ratnagiri

आम्हाला आंदोलनापासून रोखण्यात आलं. तुम्ही तिथं गेला तर आंदोलन भडकेल, असं एसपींचं म्हणणं होतं. आम्ही तुम्हाला आंदोलनस्थळी जावू देणार नाही, अशी भूमिका एसपींनी घेतली होती. पोलिसांनी मला आणि आणखी सात जणांना ताब्यात घेतलं. याबाबत उध्दव ठाकरेंसोबत चर्चा करुन पुढची भूमिका ठरवणार असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.