Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला गावातूनच विरोध, उपसरपंचासह 70 ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Maratha Aarakshan: अंतरवाली सराटी परिसरातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे म्हणत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत उपोषणाला परवाणगी देऊ नये अशी मागणी केली आहे.
Manoj Jarange Patil|Maratha Aarakshan|Antarwali Sarati
Manoj Jarange Patil|Maratha Aarakshan|Antarwali SaratiEsakal
Updated on

लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या त्यांच्या गावात 4 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी त्यांच्याच गावातून धक्कादायक बातमी आली आहे.

अंतरवाली सराटी परिसरातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे म्हणत तेथील ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन दिले आहे.

या निवेदनाद्वारे मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटीमध्ये उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर उपसरपंच, पाच ग्रामपंचायत सदस्य आणि 70 ग्रमास्थांच्या सह्या आहेत.

Manoj Jarange Patil|Maratha Aarakshan|Antarwali Sarati
Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात गेल्या तीन ते चार दिवसांपासून गावात सह्यांची मोहीम सुरू होती.

या निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जातीय तेढ निर्माण होत आहे. त्याचबरोबर जातीय सलोखाही बिघडत आहे. या आंदोलनामुळे येत्या काळात मोठा वाद आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

यासह इतर अनेक मागण्यांचे निवेदन अंतरवाली सराटीचे उपसरपंच, 5 ग्रामपंचायत सदस्य आणि आणि 70 गावकऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

आता या सर्व घडामोडींवर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil|Maratha Aarakshan|Antarwali Sarati
Arun Gawli News: डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका; मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला दिली स्थगिती

यावेळी बोलताना अंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थ म्हणाले, या आंदोलनाची दिशा भरकटत चालली आहे. आपल्याला जे पाहीजे ते मिळत नाहीये गेल्या 11 महिन्यांपासून आपण त्यामध्येच व्यस्त आहोत. तसेच गावही याला कंटाळले आहे. या लोकसभेच्या वातावरणात गावात जातीय सलोखा बिघडला आहे. लोक एकमेकांशी बोलत नाहीत. त्यामुळे अनेक लोक मागणी करत आहेत की, हे थांबवा आणि गावाची यातून सुटका करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.