'बाळासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन पदराआडून'

'बाळासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन पदराआडून'
Updated on
Summary

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि पुढील पाच वर्षही महाविकास आघाडीची सत्ता येईल.

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि प्रवीण दरेकर (pravin darekar) यांच्या पदराआडून आल्यामुळे त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणे शक्य झाले. मात्र त्यांना बाळासाहेबांचे आशीर्वाद लाभणार नाही, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी आज येथे केली. खासदार विनायक राऊत यांनी आज आमदार दिपक केसरकर (deepak kesarkar) यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, नारायण राणे (narayan rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे महाविकास आघाडीत हलचल माजणार नाही, तो त्यांचा भ्रम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि पुढील पाच वर्षही महाविकास आघाडीची सत्ता येईल.

'बाळासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन पदराआडून'
मुंबई महापालिका जिंकणं, ही माझी जबाबदारी - नारायण राणे

पुढे ते म्हणाले, कोकणात पर्यटन स्थळावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची मागणी आहे. दिपक केसरकर यांनी निर्माण केलेला चांदा ते बांदातील पर्यटन पॅटर्न योजनेला चालना मिळावी म्हणून प्रयत्न आहेत. केंद्रातील भाजपा सरकारने महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांची आंदोलने, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाचशे शेतकऱ्यांच्या मृत्यू, सरकारी मालमत्ता विकण्याचे केंद्र सरकारने धोरण ठेवले आहे, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे, त्यामुळे भाजपा विरुद्ध जनतेत खदखद आहे.

खासदार राऊत म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मृतिस्थळाच्या भेटीनंतर जी टीका आणि भाकिते वर्तविली जात आहेत त्याचा काहीही फायदा होणार नाही. नारायण राणे यांनी स्मृतिस्थळावर पदराआडून दर्शन घेतले आहे. बाळासाहेब यांचा त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. उलट बाळासाहेबांचे असा कृतघ्न माणूस पुन्हा महाराष्ट्रात जन्माला येऊ नये असे आशीर्वाद असतील.

'बाळासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन पदराआडून'
World Photography Day 2021 - जगणं समतोल करूया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()