'भाजपला रोखण्यास महाविकास आघाडी खंबीर, त्यासाठी एमआयएमची गरज नाही'

भाजपचे महाविकास आघाडी अस्थिर करण्याचे मनसुबे यशस्वी कदापि होऊ दिले जाणार नाहीत.
Shiv Sena Leader Vinayak Raut Interacts With Press At Aurangabad
Shiv Sena Leader Vinayak Raut Interacts With Press At Aurangabadesakal
Updated on

औरंगाबाद : भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, महाविकास आघाडी खंबीर आहे. त्यासाठी एमआयएमची गरज नाही. एमआयएम आणि हिंदुत्व एकत्र जोडणे अशक्य असून एमआयएमचा बोलवताधनी भाजप असून एमआयएमने खुशाल त्यांचे बटीक व्हावे. भाजपचे महाविकास आघाडी अस्थिर करण्याचे मनसुबे यशस्वी कदापि होऊ दिले जाणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिला. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार राऊत मंगळवारी (ता.२२) औरंगाबाद (Aurangabad) येथे आले. सकाळी क्रांती चौकातील आमदार अंबादास दानवे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दानवे यांच्यासह संपर्कनेते विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मण वडले, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते. (Vinayak Raut Say, Mahavikas Aghadi Will Prevent BJP Not Need Of MIM)

Shiv Sena Leader Vinayak Raut Interacts With Press At Aurangabad
'मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे, मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे'

राऊत यांनी यावेळी मुंबई येथील हज हाऊसमध्ये दोन वर्षांपूर्वी आयोजित इफ्तार पार्टीत डोक्यावर गोल टोपी घालून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहभागी झाल्याचे फोटो सादर केले. याच फोटोचा संदर्भ देत राऊत म्हणाले, फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख ‘ जनाब ' असा केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील तमाम नागरिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी दिली आहे. ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे चालायला लागले. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची व्यापक व्याख्या केली.

Shiv Sena Leader Vinayak Raut Interacts With Press At Aurangabad
... तर RSS ला जनाब संघ म्हणणार का? : संजय राऊत

त्याला न्यायालयाने देखील मान्यता दिली. असे असताना फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख जनाब असा करावा, ही बाब अक्षम्य आहे. आम्ही त्याचा धिक्कार करतो. देवेंद्र फडणवीस स्वतःच दोन वर्षांपूर्वी इफ्तार पार्टीत गोलटोपी घालून जनाब झालेले आहेत. यामुळे यापुढे आम्ही त्यांचा उल्लेख जनाब देवेंद्र मिय्याँ असाच करणार आहोत. सर्वांनीच त्याचा धिक्कार केला आहे. मतांच्या लाचारीसाठी शिवसेनेने (Shiv Sena) हिंदुत्व कधीही सोडले नसल्याचे राऊत म्हणाले.

Shiv Sena Leader Vinayak Raut Interacts With Press At Aurangabad
ठाकरे सरकारकडून राज्यपालांचा वारंवार अपमान : देवेंद्र फडणवीस

भाजपने गाठला कपटनीतीचा कळस

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फुट पाडून त्रास देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. संभ्रम निर्माण व्हावा म्हणून भाजपने कपट नितीचा कळस गाठल्याच आरोप करून राऊत यांनी एमआयएमला लक्ष केले. एमआयएमला भाजपची बटीक म्हणून रहायचे असेल तर त्यांनी खुशाल तसे रहावे. एमआयएम व हिंदुत्व एकत्र जोडणे शक्य नाही. भाजपच्या सांगण्यावरुन शिवसेनेच्या वाट्याला एमआयएम हा पक्ष आल्यास ते सहन केले जाणार नाही. एमआयएमचा बोलवताधनी भाजप असून भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असे राऊत म्हणाले. दिल्लीपासून गावापर्यंतच्या भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना शिवसेनेबद्दल आकर्षण आहे. शिवसेनाप्रमुखांबद्दल आदर असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()