Viral Video: कुठला रस्ता, कसला अंधार! महाराष्ट्रातल्या ST स्टँडवर दिव्यांग व्यक्तीची चिखलातून वाट, सुन्न करणारा व्हिडीओ

Marathwada News: व्हिडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती बसस्थानकामध्ये बसच्या दिशेने जात आहे. चिखलातून, पाण्यातून कशीबशी वाट काढत रांगत जावून तो बसमध्ये चढला. परंतु त्याची ती अवस्था बघून मन सुन्न झालं. बस स्थानकातील दूरवस्थेवर नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

मुंबईः दिव्यांग व्यक्तींना समान संधी देण्याबाबत कायम बोललं जातं. परंतु त्यांच्या सुविधांबाबत आजही विचार केला जात नाही. दिव्यांगांना समाजात वावरताना अनेक दिव्यं पार करावी लागतात. मागच्या दोन दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती बसस्थानकामध्ये बसच्या दिशेने जात आहे. चिखलातून, पाण्यातून कशीबशी वाट काढत रांगत जावून तो बसमध्ये चढला. परंतु त्याची ती अवस्था बघून मन सुन्न झालं. बस स्थानकातील दूरवस्थेवर नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.

दिव्यांग व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. दैवाने तर छळलच पण व्यवस्थेनेही सोडलं नाही, अशी अवस्था या दिव्यांग बांधवाची झाली आहे. उखडलेल्या डांबरीवरुन, पाण्यातून, चिखलातून रांगत चालणं किती त्रासदायक झालं असेल, याची कल्पना न केलेली बरी.

एका युट्यूब चॅनलेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. बीड, धनंजय मुंडे, मराठवाडा या विषयांशी संबंधित व्हिडिओचे प्रमाण या चॅनेलवर जास्त आहे. त्यामुळे हा व्हिडिओ देखील मराठवाड्यातील असावा, असंही सांगितले जाते. हा व्हिडिओ राज्यतील कोणत्या बस स्टँडवरचा आहे, याची ठोस माहिती मिळाली नाही.

व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने त्या दिव्यांग व्यक्तीला मदत केली पाहिजे होती, अशा प्रतिक्रिया देखील युजर्सनी दिल्या आहेत. 'सकाळ'ने व्हिडिओची पडताळणी केली. १० ऑगस्ट रोजी मानव आरयू या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.