Pune Chakan News: चाकण- तळेगाव, चाकण -शिक्रापूर मार्ग, पुणे -नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते असते. आज सायंकाळी पाच वाजले पासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कंपनीतून सुटलेल्या कामगारांना अक्षरशः त्यांची बस सोडून घरी पायी जावे लागत होते. वाहतूक कोंडी ने त्रस्त झालेल्या एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर "नेत्यांनो राजीनामे द्या" अशी संतप्त पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
चाकण- तळेगाव, शिक्रापूर मार्गाला मंजुरी मिळाली अशी आश्वासने अनेक वेळा देण्यात आली. परंतु मार्गाचे काही काम चालू होत नाही.पुणे- नाशिक महामार्गाचे काम चालू होणार अशी आश्वासनसनंही केंद्रीय मंत्री सबंधित खासदार यांनी दिली. परंतु पुणे- नाशिक महामार्गाचे कामही 2019 नंतर झालेल्या निवडणुकीनंतर झाले नाही.
त्यामुळे नागरिक,कामगार, विद्यार्थी,उद्योजक सारेच संतप्त झाले आहेत. तळेगाव मार्गावर तसेच पुणे -नाशिक महामार्गावर,चाकण -शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते.अगदी दोन, तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात.त्यामुळे करायचे काय? हा प्रश्न नागरिक,उद्योजक,कामगार,विद्यार्थी,शेतकरी या साऱ्यांनाच पडला आहे. वाहतूक कोंडी झाली की अक्षरशः लोक, कामगार बस मधून उतरतात आणि अगदी एक-दोन किलोमीटर पायी जातात. वाहतूक कोंडीचे नेत्यांना सोयरसुतक नाही. अशी नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया आहे.
अरुंद रस्ते आणि त्यात वाहतूक कोंडी त्यामुळे चाकण येथील सर्व रस्ते वाहतूक कोंडीने जाम होत आहेत. सकाळी उठलं आणि रात्री घरी परतायचं म्हटलं की, वाहतूक कोंडी आमच्या पाचवीलाच पूजलेली आहे. असा संतप्त सवाल सर्वांचा आहे.
त्यावर उत्तर काही कामातून मिळत नाही. "ही वाहतूक कोंडी केव्हा बरे सुटणार हा प्रश्न आम्हाला पडला आहे. नागरिकांचे जीव घेणार का, वाहतूक कोंडीत नागरिकांचा श्वास अडकला आहे.असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते दीपक मांडेकर, आप्पा कड, माजी उपसरपंच प्रकाश खराबी, बाळासाहेब शिळवणे, भाजपचे नेते संदीप सोमवंशी यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.