Sangali Loksabha: विशाल पाटील यांच्यापुढे 'आतापुरते थांबण्याचाच' पर्याय?

Vishal Patil: सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अशात सांगली लोकसभेच्या बॅलट वरून सलग दुसऱ्यांदा हात हे चिन्ह च गायब होणे. हे संगलीकराना आणि विशेषतः काँग्रेस कार्यकर्त्यांना आवडलेले नाही.
Sangali Loksabha|Vishal Patil
Sangali Loksabha|Vishal PatilEsakal
Updated on

सांगलीची अधिकृत उमेदवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पै. चंद्रहार पाटील यांना जाहीर झाल्यानंतर विशाल पाटील नक्की काय करणार अशी चर्चा गेले २-३ दिवस आहे.

"सांगली काँग्रेसचीच" अशी ठाम भूमिका घेणारे व विशाल पाटलांच्या तिकिटासाठी थेट दिल्लीला साकडे घालणारे डॉ. विश्वजीत कदम यांचीही काय भूमिका असणार याकडेही लोकांचे लक्ष लागलेले आहे. या दोघांनीही कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगून वेळ घेईल असला तरी आता विशाल पाटील यांच्याकडे "आतापुरते थांबण्याशिवाय" काही पर्याय उरलेला नाही असे आता दिसते. त्यामागे ४ प्रमुख कारणे आहेत.

सांगलीची सहानुभूती ही काँग्रेसबद्दल

सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशावेळी सांगली लोकसभेच्या बॅलटवरून सलग दुसऱ्यांदा हात हे चिन्ह गायब होणे. हे संगलीकराना आणि विशेषतः सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. त्यामुळे, विशाल पाटील जर हाताच्या चिन्हावर उभारले असते म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत झाली असती तर त्यांना जी सहानुभती मिळाली असती ती अपक्ष म्हणून किंवा वंचितकडून लढल्यास मिळणार नाही. त्यामुळे, महाविकास आघाडीची किती मते त्यांच्याकडे येतील याबद्दल शंका आहे.

डॉ. विश्वजीत कदम यांना पक्षाविरोधी काम करता येणार नाही

कदम यांचे विरोधक त्यांच्या पक्षनिष्टेबद्दल कितीही शंका उपस्थित करत असले तरी कदम कुटुंबीय हे आजवर कायम काँग्रेससोबत राहिले आहे हे सत्य आहे. विश्वजीत कदम हे फक्त सांगली जिल्ह्याचे नेते नसून, राज्यातील एक प्रमुख युवा नेते आहेत. शिवाय त्यांचे गांधी घराण्याशी थेट संबंध आहेत. सांगली बाबत त्यांना थेट हायकमांडने "महाविकास आघाडी टिकवायची असेल तर सांगली सेनेला सोडावी लागेल" असे सांगितल्याचे समजले.

अशावेळी कदमांनी जर का आघाडच्या उलटे काम केले तर त्याचे परिणाम राज्यभर उमटू शकतात. याआधी कोल्हापूरात जेव्हा "आमचं ठरलंय" चा प्रयोग झाला तेव्हा तो दोन नेत्यामधील सर्वज्ञात संघर्ष होता आणि त्याला तेथील जनतेची नैसर्गिक संमती होती. तशी परिस्थिती सांगलीत नाही. त्यामुळे विश्वजीत कदम हे पक्षाला सर्वोच्च मानून मन मारून का होईना महाविकास आघाडीचे काम करतील किंवा त्यांना करावे लागेल असे चित्र आहे.

कदम यांची ताकद सांगली लोकसभेच्या ३ मतदारसंघात आहे. अशावेळी त्यांचे कार्यकर्ते, मतदार जरी स्प्लिट झाले किंवा छुपी मदत करायचा प्रयत्न केला तरी तो फारसा शक्य नाही.

Sangali Loksabha|Vishal Patil
Sanjay Raut: "भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण केव्हाही चांगले," मोदींच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

जयंत पाटील महाविकास आघाडीच्या बाजूनेच

दादा- बापू घराण्यातील संघर्ष सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे. गेल्या २ महिन्यातील घडामोडी सांगलीने पाहिलेल्या आहेत. अशावेळी जयंत पाटील हे त्यांची ताकद महाविकास आघाडी च्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीमागे लावणार हे स्पष्ट आहे.

शिबाय महाविकास आघाडीचे शिल्पकार असणाऱ्या शरद पवार यांच्या पक्ष्याचे ते प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या जिल्ह्यातून तरी ते मविआ च्या उमेदवाराला नक्की बळ द्यायचा प्रयत्न करतील.

Sangali Loksabha|Vishal Patil
Loksabha Election 2024 : न्यायाची हमी देणारा दस्तावेज ; काँग्रेसने मांडले ‘नवसंकल्प आर्थिक धोरण’

नक्की सहानुभूती कोणाची?

आज राज्यात भाजपविरोधी खंबीर राजकारण करणारे नेते म्हणून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. मतदान करताना मशाल चिन्ह दिसल्यावर ही सहानुभती लोकांना आठवणार आहे. अशावेळी दादा घराण्यावर अन्याय ही त्याहून मोठी सहूनुभती ठरू शकते का याबद्दल शंका आहे.

याला दोन प्रमुख कारणे आहेत, आता असणाऱ्या ५०-६०% मतदात्यांनी वसंत दादांना पाहिलेले नाही, फक्त त्यांचे काम ऐकलेले आहे. अशावेळी वसंत दादांचा नातू या एकाच मुद्यावर आजची पिढी विशाल पाटलांना मत देईल असे वाटत नाही.

याउलट ठाकरे-पवार हे आजच्या तरुणाई चे हिरो आहेत. शिवाय वसंतदादांच्या निधनापासून ते २०१४ पर्यंत जवळपास ३५ वर्षे सांगलीची खासदारकी ही दादा घराण्यातच राहिलेली आहे. अशावेळी त्यांच्यावर अन्याय कसा? आणि या ३५ वर्षातले त्यांचे काम काय? असा मुद्दा भाजपकडून काढला जाऊ शकतो. देशभर चालवल्या जाणाऱ्या ७० वर्षे विरुद्ध १० वर्षे या नरेटिव्ह ला पूरक असा हा मुद्दा आहे. याने इलेक्शन अवघड नक्की होऊ शकते.

या चार मुद्यांचा विचार करता आतातरी विशाल पाटील यांना थांबण्याशिवाय पर्याय नाही, असे राजकीय क्षेत्रात बोलले जाऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.