Vishalgad Violence: "मुदत दिली असतानाही हिरोगिरी केली, संभाजीराजेंकडून वसूल करा"; अजित पवार गटाच्या नेत्याची मागणी

विशाळगडावर धुडगूस घालणारे लोक हे शिवभक्त नाहीत तर अतिरेकी आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Vishalgad Encroachment Dispute
Vishalgad Encroachment Disputeesakal
Updated on

सांगली : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरीही संभाजीराजेंनी तिथं जाऊन हिरोगिरी केली. इथल्या नुकसानीची भरपाई ही संभाजी छत्रपती यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून करण्यात आली आहे. तसंच विशाळगडावर धुडगूस घालणारे लोक हे शिवभक्त नाहीत तर अतिरेकी आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Vishalgad Encroachment Dispute
Infosys Freshers Hiring : इन्फोसिसमध्ये होणार फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची मोठी भरती; जाणून घ्या प्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडी यांनी विशाळगड हिंसाचारावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, विशाळगड गजापूर येथील घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक केली. इथं विशिष्ठ समाजला टार्गेट केलं गेलं, हे शिवभक्त नसून अतिरेकी आहेत. विशाळगड गजापूर येथील घटनेचा निषेध करत नायकवडी यांनी नुकसान भरपाई संभाजी महाराज यांच्याकडून वसुल करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली.

Vishalgad Encroachment Dispute
Vidhan Parishad Election: काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये! विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 'या' पाच आमदारांवर कारवाईचे आदेश

अतिक्रमण काढण्यासाठी मुदत दिली होती त्याआधीच हिरो होण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा आरोपही यावेळी नायकवडी यांनी संभाजीराजे यांच्यावर केला आहे, ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संभाजीराजेंवर कठोर कारवाई झाली पाहिजे, कोणाचीही सत्ता येवो गुन्ह्यांमध्ये तडजोड होता कामां नये असंही नायकवडी म्हणाले. समाजाने खूप संयम बाळगला आहे, अशी घटना पुन्हा घडली तर मुस्लिम समाज पुढील काळात जशात तसे उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.