पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकरांकडे; नितीन करीर मुख्य सचिवपदी

पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं ते आज निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकरांकडे; नितीन करीर मुख्य सचिवपदी
Updated on

मुंबई- पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं ते आज निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. पण, त्या या पदासाठी इच्छूक नव्हत्या. त्या मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी प्रयत्न करत आहेत.

नितीन करीर यांना मुख्य सचिवपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. नितीन करीर हे १९८८ च्या आयएएस बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दुसरीकडे, विवेक फणसाळकर हे पोलीस महासंचालक पदासाठी इच्छूक होते. पुढील नियुक्ती होईलपर्यंत त्यांना पोलीस महासंचालक पदाचा पदभार सांभाळावा लागणार आहे. (Vivek Phansalkar is holding the interim charge of the post of Director General of Police Nitin Karir as Chief Secretary maharashtra)

पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकरांकडे; नितीन करीर मुख्य सचिवपदी
Eknath Khadse: भेट झाल्यानंतर लगेच क्लिनचिट मिळाली? रश्मी शुक्ला प्रकरणावर खडसेंचा गौप्यस्फोट

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात येईल अशी दाट शक्यता होती. तशाप्रकारची चर्चा सुरु झाली होती. शिवाय त्या ज्येष्ठता यादीमध्ये सर्वात वरती होत्या. तसेच त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या असल्याने त्यांना पोलीस महासंचालक करण्यात येईल असं जवळपास निश्चित होतं. पण, तुर्तास त्यांना पदापासूर दूर ठेवण्यात आलं आहे.

दुसरीकडे, नितीन करीर हे १९८८ च्या बॅचचे IAS असलेले महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले आहेत. सध्या ते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. आज संध्याकाळी सीएस मनोज सौनिक यांच्याकडून नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.