'लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत'; इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

म्युझियमकडून मागविलेल्या माहितीतून ती वाघनखं शिवरायांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही.
Wagh Nakh Chhatrapati Shivaji Maharaj
Wagh Nakh Chhatrapati Shivaji Maharajesakal
Updated on
Summary

सातारच्या छत्रपती घराण्याकडे शिवरायांची वाघनखं कायम राहिली आहेत. महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ग्रँड डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून भेट म्हणून देण्यात आली.

कोल्हापूर : लंडनमधील व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियममधून (Victoria and Albert Museum) आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची नाहीत, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (History Researcher Indrajit Sawant) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. त्यासंदर्भात म्युझियमकडून पत्र मिळाले असून, शासनातील संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सावंत म्हणाले, ‘शासन व म्युझियम यांच्यात ३ ऑक्टोबर २०२३ ला विविध वाघनखांपैकी एक वाघनखं तीन वर्षांकरिता भाडेतत्त्वावर आणण्याचा सामंजस्य करार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती शिवरायांची असल्याचा दावा प्रसार माध्यमांतून केला होता. ही वाघनखं शिवरायांची नसल्याबाबत मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव व राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांना पत्राद्वारे कळवले होते.

Wagh Nakh Chhatrapati Shivaji Maharaj
सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; मुलांच्या रक्षाविसर्जना दिवशीच आईनंही सोडला प्राण, बाप पूर्णत: उद्ध्वस्त

म्युझियमकडून मागविलेल्या माहितीतून ती वाघनखं शिवरायांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही. शासन, मंत्री, संबंधित अधिकारी महत्त्वाची माहिती जनतेपासून लपवत असून, ही गंभीर बाब आहे. शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत आहे.’

ते म्हणाले, ‘वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. सातारच्या छत्रपती घराण्याकडे शिवरायांची वाघनखं कायम राहिली आहेत. महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ग्रँड डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून भेट म्हणून देण्यात आली. ती त्याच्याकडे कशी आली, याचीही माहिती नाही. ती १८१८ च्या दरम्यान त्याच्याकडे आली असल्याचा अंदाज सांगितला जातो.

मॉडर्न रिव्ह्यूच्या अंकात १९०७ ला साताऱ्यातील वाघनखांचे छायाचित्र छापले आहे. इतिहास अभ्यासक एच. वेबरीज याने १९२१ला केंब्रिज विद्यापीठाकडून छापलेल्या लेखात व्हिक्टोरिया ॲन्‍ड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं शिवरायांच्या वाघनखांची प्रतिकृती असल्याचे म्हटले आहे.’ पत्रकार परिषदेस राम यादव, अमित आडसूळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.