Sudhir Mungantiwar : वाघनखे पुढील आठवड्यात साताऱ्यात ;सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधील‘व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियम’मधून १९ जुलैला साताऱ्याच्या शासकीय संग्रहालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज शस्त्रास्त्र प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत.
Sudhir Mungantiwar : वाघनखे पुढील आठवड्यात साताऱ्यात ;सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधील‘व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियम’मधून १९ जुलैला साताऱ्याच्या शासकीय संग्रहालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज शस्त्रास्त्र प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत वाघनखांसह इतर शस्त्रास्त्रे पाहता येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

ही वाघनखे तीन वर्षांसाठी राज्यातील विविध संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटनमधून वाघनखे कधी आणणार, यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानिमित्ताने मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत निवेदन सादर केले.

वाघनखांच्या सत्यतेवर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत त्यांनी माहिती दिली. ‘ही वाघनखे लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ मध्ये ही प्रदर्शने भरविण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार ही वाघनखे त्या संग्रहालयात असल्याचे सांगण्यात आले. आमचा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखे दर्शनासाठी देऊ असे सांगितले. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखे आपल्याकडे राहतील असा निर्णय झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले. वाघनखे आणण्यासाठी फार मोठा खर्च झाला नसून केवळ १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाल्याचीही माहिती मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

वाघनखे खरी की खोटी?

लंडनच्या संग्रहालयामध्ये ठेवलेली ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ही ती वाघनखे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विधिमंडळामध्येही यावर चर्चा झाली असून मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली.

आपण त्यासंदर्भातील पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनखे शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत, असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचे उत्तर आले. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखे ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.