लाईफ संपलेल्या वाहनांवरील होणार दंड माफ; नक्की निर्णय काय? जाणून घ्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
Scrap vehicle
Scrap vehicle
Updated on

मुंबई : राज्यातील लाईफ संपलेल्या भंगार वाहनांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी जुन्या वाहनांचे ऐच्छिकपणे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. (Waiver of fines on scrap vehicles What exactly is decision need to know)

Scrap vehicle
Liz Truss : लिझ ट्रस यांचा युकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा!

नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा देणाऱ्यांमार्फत स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनांचा थकीत असणारा मूळ मोटार वाहन कर वसूल करून त्यावरील व्याज व संपूर्ण पर्यावरण कर तसेच व्याज माफ करण्यात येणार आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी वाहनाची लिलाव किंमत ही मूळ करापेक्षा जास्त असल्यास थकीत कर वसूल करून उर्वरित रक्कम वाहन मालकास परत करण्यात येणार आहे. ही व्याज व दंड माफी धोरण तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहील, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Scrap vehicle
'नीती' आयोगाच्या धर्तीवर 'मित्र' ते राजकीय खटले मागे घेणार; जाणून घ्या मंत्रिमंडळाचे निर्णय

कराच्या १० टक्के सूट मिळणार

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५१ ए मध्ये दिल्यानुसार नोंदणी केल्यापासून स्वेच्छेने आठ वर्षांच्या आत वाहन स्क्रॅप केल्यास परिवहन वाहनांना वार्षिक कराच्या १० टक्के सूट मिळेल. नोंदणी केल्यापासून स्वेच्छेने १५ वर्षांच्या आत वाहन स्क्रॅप केल्यास परिवहनेत्तर वाहनांना एक रकमी कराच्या १० टक्के सूट मिळेल. सरकारच्या सर्व विभागांनी बेवारस असलेल्या स्क्रॅप वाहनांचा लिलाव हा केवळ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा देणाऱ्यांमार्फत करावा.

Scrap vehicle
"CM योगी शूर, इमानदार"; बुलडोझर चालवल्यानंतर गँगस्टरकडून कौतुकाचा वर्षाव

तसेच लिलावाच्या वाहनाची किंमत ही स्क्रॅप बाजारमूल्यापेक्षा कमी नसावी. या धोरणामुळे रस्त्याच्या बाजूला सोडून दिलेल्या भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटेल. तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.