एकनाथ शिंदे जागे व्हा! तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही; राष्ट्रवादीचा महत्त्वपूर्ण सल्ला

बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेनं चालल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यावर आता बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Eknath Shinde, Devendra Fadnavis ,Chandrashekhar Bawankule, Amol Mitkari)

Eknath Shinde
Baramati crime News: बारामतीत टग्यांच्या बाजारात 'मुळशी पॅटर्न'चा थरार; तरुणांनी...

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून आता त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याबाबत बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे. एवढचं बोलून ते थांबलेले नाहीत तर यापुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे.

Eknath Shinde
Delhi Accident Video: धक्कादायक! भरधाव कारने 3 मुलांना चिरडलं, एकाची प्रकृती गंभीर

असंही बावनकुळे म्हणाले आहेत. त्यावर राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी सल्ला देताना लिहिलं आहे की,"एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही !जागे व्हा !!" त्यामुळे पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.