वर्धा : आर्वीच्या अवैध गर्भपात प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयाची तपासणी केली. ही तपासणी करताना गर्भपाताच्या नोंदी (Wardha Abortion Case) दर तीन महिन्यांनी शासनाला पाठवायाच्या असताता. पाठविलेल्या नोंदी आणि येथील नोंदवही तंतोतंत जुळत (Annual entries matched) असल्याचे पाहून तपास अधिकारीही बुचकाळ्यात पडले आहेत.
तपास पथकाने रुग्णालयात तब्बल १५ तास घालवले. यात त्यांनी अनेक कागदपत्र जप्त केले. शिवाय शासकीय व अन्य औषधसाठा असलेली तब्बल १० कपाटे सील केली. रुग्णालयात कालबाह्य औषधसाठा आढळून आला आहे. त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या यापूर्वीच दिल्याचे चौकशी पथकाकडून सांगण्यात आले.
कालबाह्य झालेल्या माला डीएन गोळ्या आणि ऑक्सिटोसिन इंजेक्शन या पथकाने जप्त केल्याची माहिती आर्वी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिली. या तपासणीचा कच्चा अहवाल त्यांनी तयार केला असून तो लवकरच जिल्हा समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. त्यांच्याकडून सूचना मिळाल्यानंतरच या प्रकरणातील कारवाईची पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
शासनाचे विशेष पथकाचे संकेत
प्रकरणाचा अहवाल पीसीपीएनडीटीच्या अशासकीच सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी आर्वीला भेट दिल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केला. या प्रकरणात कोणत्याही दोषीला माफी मिळणार नाही याची काळजी घेण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठणाचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय या प्रकरणाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पतीच्या सांगण्यावरून काम
अवैध गर्भपात प्रकरणात (Wardha Abortion Case) अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांनी आपण हे काम पतीच्या सांगण्यावरून करीत असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यानंतरच पोलिसांकडून डॉ. नीरज कदम यांना अटक केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.