Ramdas Tadas : भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप; लोखंडी रॉडने मारहाण अन् बाळाच्या डीएनएची मागणी

''मला दोन वेळच्या जेवणाची सोय नाही की बाळाला दूध पाजण्यासाठी पैसे नाहीत. जर लोकप्रतिनिधी सुनेला न्याय देऊ शकत नाही नसतील तर समाजाला काय न्याय देतील?'' असा सवाल पूजा तडस यांनी उपस्थित केला.
Ramdas Tadas
Ramdas Tadas esakal
Updated on

मुंबईः वर्धा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या बाळाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप सून पूजा तडस यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पूजा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस म्हणाल्या की, तडस कुटुंबियांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली. बाळाचा बाप कोण आहे? असे प्रश्न विचारुन माझी बदनामी केली, बाळाची डीएनए टेस्ट करायला सांगितलं आहे. खासदारांनी त्यांच्या मुलाला बेदखल केलं म्हणतात पण प्रत्यक्षात मुलाला घरात ठेवलं आहे आणि मला बाहेर काढलं आहे.

Ramdas Tadas
X Down : एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी

''मला दोन वेळच्या जेवणाची सोय नाही की बाळाला दूध पाजण्यासाठी पैसे नाहीत. जर लोकप्रतिनिधी सुनेला न्याय देऊ शकत नाही नसतील तर समाजाला काय न्याय देतील?'' असा सवाल पूजा तडस यांनी उपस्थित केला. त्यामुळे त्यांनी वर्ध्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.

सुषमा अंधारे यांनीही भाजप आणि तडस कुटुंबियांवर आरोप केले. एकीकडे मोदी देशाला आपलं कुटुंब मानतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदाराच्या सुनेवर अत्याचार होतो, हे अतिशय गंभीर आहे. मोदींनी पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Ramdas Tadas
Eid Special Recipe 2024 : ईदनिमित्त घरच्या घरी झटपट बनवा शीर-खुरमा, चवीला लागतो एकदम बेस्ट, वाचा सोपी रेसिपी

दरम्यान, पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनीही पूजा यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हा हनीट्रॅपचा प्रकार असून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याच्या दोन हजार क्लिप माझ्याकडे आहेत, असं ते म्हणाले. यात सहा प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे मी फारकाही बोलू शकणार नाही. विरोधकांना हाताशी धरुन तमाशा करण्याचा प्रकार आहे. ज्या मुलीला संसार करायचा असतो ती असा तमाशा करत नाही, असं पंकज म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.