Maharashtra Weather : शेतकऱ्यांच्या चिंचेत वाढ! पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा
Maharashtra Weather
Maharashtra WeatherEsakal
Updated on

महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदलताना दिसून येत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात काही तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर विदर्भात मात्र या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील पाच दिवस किमान तापमान चार डिग्रीने तर कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

Maharashtra Weather
Devendra Fadnavis : काही लोक सकाळी ९ वाजता नशा करुन कुस्ती खेळतात; देवेंद्र फडणवीसांकडून राऊतांचा समाचार

राज्यात काही भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Maharashtra Weather
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीचं 'असं' केलं समर्थन; म्हणाले घराण्याची परंपरा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.