Latest Marathwada News: मराठवाड्यातील मोठ्या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपुढे गेला. ११ मोठ्या धरणांमध्ये ५९.३१ टक्के पाणीसाठा झाला. मोठे, मध्यम, लघुप्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये मिळवून ५३.२२ टक्के पाणीसाठा सध्या झालेला आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणात शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी आठपर्यंत ७९.३५ टक्के पाणीसाठा झाला.
जलसंपदा विभागाच्या शुक्रवारच्या (ता.३०) अहवालानुसार ११ मोठ्या धरणांमध्ये ५९.३१ टक्के पाणीसाठा झाला आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ४४.०६ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांत ४०.८० टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४२.०७ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ७१.१७७ असे मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमध्ये ५३.२२ टक्के पाणीसाठा झाला.