'शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं शल्य सर्वांनाच, पण..'

Jayant Patil Shashikant Shinde
Jayant Patil Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

'एका पराभवानं खचायचं नसतं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय.'

पळशी (सातारा) : शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या पराभवाचे शल्य आम्हा सर्वांनाच आहे. एका पराभवाने खचायचे नसते, पुन्हा ताकद लावून पडलेला किल्ला परत घ्यायचा, हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी शिकवले आहे, हे काम तुम्ही कोरेगाव मतदारसंघात पुन्हा करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त कोरेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, प्रदीप विधाते, सारंग पाटील, नितीन पाटील, सत्यजित पाटणकर, बाळासाहेब सोळसकर, सलक्षणा सलगर, मेहबूब शेख, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, सुनील माने, तेजस शिंदे, शिवाजीराव महाडिक, भास्कर कदम, अरुण माने, संजय झंवर, राजाभाऊ जगदाळे, श्रीमंत झांजुर्णे, रमेश उबाळे, प्रताप कुमुकले, प्रतिभा बर्गे, संजना जगदाळे, अॅड. प्रभाकर बर्गे, अॅड. पांडुरंग भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘हा मतदारसंघ आपल्या ताब्यातून का गेला, याविषयीची चर्चा या संवाद मेळाव्यातून आपणा सर्वांशी झाली. पराभवानंतरही शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेत पाठवून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद व पक्ष संघटना आमदार शिंदे यांच्या मागे आहे, यात शंका नाही. आता पुढचे काम तुम्हाला करायचे आहे. पुढील दोन वर्षांचा कालखंड आपल्या हातात आहे. काही अस्तनीतले निखारे असतात, मतमतांतरे प्रत्येक व्यक्तीबद्दल असतात. नेतृत्वाबद्दल गैरसमज असू शकतात. त्यामुळे दुरुस्त्या आवश्यक आहेत. रमेश उबाळे यांच्यासह अनेकांनी केलेल्या सूचना दुर्लक्षून चालणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे.’ प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करणाऱ्यांविषयी काही काळानंतर लोकांमध्ये असूया निर्माण होते आणि मग ‘पैसा कुठून आणताहेत,’ अशी चर्चा सुरू होते. त्यामुळे समोर किती पैसा खर्च केला जातोय, यापेक्षा आपली संघटना कशी काम करते आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी जिल्हा, तालुका पातळीवरील पक्षाच्या सर्व समित्या परिपूर्ण करून सैन्यबळ वाढवा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.

Jayant Patil Shashikant Shinde
..तर भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण

आपला माणूस विधानसभेत जायचा राहून गेला, त्यामुळे पुन्हा गुलाल घेण्याचा संकल्प आपण करूया, असे खासदार पाटील यांनी सांगितले. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘बूथ समित्यांचा प्रभावी उपयोग करून घेतला नाही, हे पराभवाच्या कारणांपैकी एक कारण आहे. आता बूथ समित्या सक्षम करू. त्यामुळे पुन्हा गुलाल उधळण्याची संधी निश्चितपणे मिळेल. काही लोक गर्वाने ‘इथेनॉलचा जनक मीच,’ असे म्हणत आहेत; पण आता किसन वीर साखर कारखान्याची निवडणूक जिंकून आपण मकरंद पाटील यांना सहकारातील ‘किसन वीर’चा जनक बनवूया.’’ सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांची भाषणे झाली. याप्रसंगी राष्ट्रवादीमध्ये पुनर्प्रवेश केल्याबद्दल अॅड. नितीन भोसले यांचा, सातारा तालुका राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष साळुंखे व राष्ट्रवादी युवकच्या कोरेगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन लवंगारे यांचा सत्कार झाला. भास्कर कदम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश होळ यांनी आभार मानले.

Jayant Patil Shashikant Shinde
पंतप्रधान मोदींची डॉ. आंबेडकरांशी तुलना; संगीतकाराच्या वक्तव्यानं नवा वाद

‘जिहे- कटापूर’चे महिन्यात उद्‍घाटन

जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘जिहे- कटापूर योजना आपण केली आहे. केंद्र सरकारने एकही पैसा दिला नाही. आम्ही विनंती केल्यावर यासंदर्भात त्यांचे एक पत्र येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या काळात अजित पवार, सुनील तटकरे असताना ही योजना मार्गी लागली. मधल्या काळात संथगतीने काम चालले होते. मागील दोन वर्षांत आपण भरपूर निधी दिला आहे. पुढील कामासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी माझ्यासमवेत बैठक केली आहे. त्यामुळे पुढील कामालाही अडचण येणार नाही. पुढच्या महिन्यात शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचे उद्‍घाटन होणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()