कोणाचा पक्ष फोडण्याचे आमचे संस्कार नाहीत; बावनकुळे यांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

supriya sule and chandrashekhar bawankule
supriya sule and chandrashekhar bawankule
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर राज्यातील राजकीय पक्ष फोडण्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी भाजपने याआधी दोन वेळा प्रयत्न केला होता. तिसऱ्यावेळी त्यांनी पूर्ण तयारी केल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना आरोप फेटाळून लावले आहेत.

supriya sule and chandrashekhar bawankule
'मनु' अजोबा चंद्रावर तिरंगा फडकला, लइ वाईट...; राष्ट्रवादीच्या आमदाराची भिडेंवर टीका

बावनकुळे म्हणाले की, आम्ही कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, आमचा तो स्वभाव नाही, संस्कार नाही, ज्यांचे संस्कार आहे ते देशाला माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांचे संस्कार त्यांना लखलाभ आहे. ज्यांनी जीवनभर पक्ष फोडण्याचे राजकारण केले. ते आमच्यावर बोलत आहेत, खरतर सुप्रिया सुळे आमच्या आदरणीय आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.

supriya sule and chandrashekhar bawankule
India Mumbai Meeting: मुंबईत 'इंडिया' नेत्यांच्या डिनरमध्ये पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाव; लोगोही होणार लाँच

स्वतंत्र्यानंतर इतिहास पहा काय-काय झाले महाराष्ट्रात. पक्ष फोडून कोणी सत्ता मिळवली, उलट एकनाथ शिंदे मर्द मराठा नेता यांनी हिंदुत्वाची साथ धरली, इकडे अजित पवार यांनी आत्मनिर्भर भारतासाठी मोदींना साथ दिल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.

दरम्यान जे आपलं घर सांभाळू शकले नाही, त्यांनी असा आरोप करणं योग्य नाही. पण मला विश्वास आहे, पुढच्या काळात शरद पवार आपल मन परिवर्तन करतील आणि मोदींना समर्थन देतील, असही बावनकुळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.