Hinganghat Burning Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवलं असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वर्ध्यातील हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारी 2020 आरोपी विकेश नगराळेने (Vikesh Nagrale) याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. दरम्यान आरोपीला कोर्टानं (Court) शिक्षा सुनावली,. पण ती अर्धवट सुनावली, माझ्या मुलीच्या दोषीला फाशीच व्हायला हवी होती, त्यांच्या पीडितेच्या आईने म्हटलं आहे.
''आम्हाला न्याय मिळाला पण तो अर्धवट मिळाला. दोषीला फाशीची शिक्षा व्हायला हवी'', असं पीडितेच्या आईने म्हटले आहे. ''आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. दोषीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पुढच्या कोर्टात जायचं की नाही, हे आम्ही ठरवू'', असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. (We got justice but it was only partial. The culprit should be sentenced to death, "said the victim's mother.)
शिक्षिकेला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्याच्या प्रकरणात आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला बुधवारी (ता. ९) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले होते. देशभरात गाजलेल्या या प्रकरणात गुरुवारी (ता. १०) शिक्षेवर सुनावणी होणार होती. याप्रकरणी न्यायालयाने निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे १० फेब्रुवारीला नागपुरात उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाला होता.
बहुचर्चित प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. पीडितेचे आई-वडील आणि नातेवाईक हेही न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.