मुंबई : सध्या राज्यात परीक्षा घोटाळा चांगलाच गाजत आहे. त्यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2021) सभागृहात प्रश्न उपस्थित केला. परीक्षांच्या घोटाळ्यांवर चर्चा लावण्याची मागणी फडणवीसांनी केली. त्यानंतर नाना पटोलेंनी (Maharashtra Congress Nana Patole) उत्तर देत या घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत? याचे कागदपत्रं आमच्याजवळ आहे, असा इशारा दिला. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फडणवीसांची मागणी काय? -
आरोग्यभरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षांमध्ये इतका मोठा घोटाळा झाला. यावर चर्चा करणार करणार नाही, असं होऊ शकत नाही. त्यासाठी वेळ नेमून द्या. न्यासा या कंपनीला २१ जानेवारी २०२१ ला अपात्र ठरलं. ते न्यायालयात गेल्या ४ मार्चला २०२१ ला पात्र केलं. मग त्यांना काम का दिलं? परीक्षांचं काम द्यायला दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का? न्यासाने परीक्षा फोडण्यापासून सर्व केलं. माजी आमदाराने हा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यांच्याकडे असलेल्या ऑडिओ क्लीपमधून एका पदासाठी कशी बोली लागली होती? हे दिसतंय. याबाबत सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली.
नाना पटोलेंनी दिला इशारा -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी योग्य आहे. त्यावर चर्चा करायला पाहिजे. हे घोटाळे कुठून सुरू झाले? त्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहे त्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहचायला पाहिजे. या परीक्षामुळे ज्या तरुणांना त्रास झाला, त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. कारवाई शासन करत आहे ते राज्याच्या जनतेला कळले पाहिजे. या घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत? त्याचे कागदपत्रं आमच्याजवळ आहेत. ते राज्यातील जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे, असा इशारा नाना पटोलेंनी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.