Chhagan Bhujbal: शिंदे गटाऐवढ्या आम्हाला जागा हव्यात; नाशिकच्या उमेदवारीबाबत भुजबळ काय म्हणाले?

candidature of Nashik: नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbaleSakal
Updated on

मुंबईृ- नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझं नाव माध्यमांनीच चर्चत आणलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. महायुतीमध्ये अनेक जागांवर एकमत झालं आहे. सर्व पक्ष एकत्र बसून ठरवतील. त्यावेळी कोणताही उमेदवार ठरला त्याच्या मागे तिन्ही पक्ष खंबीरपणे उभे राहतील, असं ते म्हणाले.

नाशिकसाठी भुजबळ कुटुंबिय आग्रही नाही. माध्यमांमध्येच याची चर्चा होत आहे. पण, त्यात सत्य नाही. आमची केवळ एकच मागणी आहे. शक्यतो आम्हाला शिंदे गटाऐवढ्या जागा देण्यात याव्यात. जास्तीत जास्त महायुतीच्या जागा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं ते म्हणाले.(What did Chhagan Bhujbal say about the candidature of Nashik)

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : कर्तृत्वहीन लोक जातीवर मते मागतात : मंत्री छगन भुजबळ

आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला गेलो होतो. कारण, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. यासंदर्भातील एका कामासाठी आम्ही गेलो होते. यात कोणतंही राजकारण नाही. मला काही मागणी करायची असेल तर मी सुनिल तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे सर्व बसून ठरवू, असं भुजबळ म्हणाले.

शिंदे गटाने अस्वस्थ होण्याचं कोणतंही कारण नाही. मीही तुमच्यातूनच आलो आहे. नाराज होण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची खाते आहेत. या कामासाठी त्यांची भेट घ्यावी लागते. लगेच चर्चा करुन आम्ही बाहेर आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Clarification: 'सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याच काम...', छगन भुजबळांचं ‘त्या’ आरोपावर स्पष्टीकरण

प्रत्येक पक्षाला जागा मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे भांडण आहे म्हणणं योग्य नाही. मतप्रदर्शन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. नाशिक आमच्याकडे आले तर आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. जागा आमच्यासाठी सुटत नाही तोपर्यंत काही चर्चा होऊ शकत नाही, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

मनसेमुळे कुठेही पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळे महायुतीची शक्ती वाढणार आहे. त्यांच्यामुळे महायुतीमध्ये कोणतीही अडचण होणार नाही, असं भुजबळ म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.