राज्यातील ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

या काळात कोकणातील आंब्यावर परिणाम होण्याची भीती आहे
Weather Update
Weather Updatesakal media
Updated on

सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरू असताना काही जिल्ह्यांना पुन्हा अवकाळीचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. (IMD)

Weather Update
कॅबिनेटच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत नव्या मंत्र्यांना शपथ

यात प्रामुख्याने अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूर सांगली तर विदर्भातील अकोला बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळणार आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात वादळी पावसाच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या काळात कोकणातील आंब्यावर परिणाम होण्याची भीती आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस म्हणजेच ८ एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल. तर याउलट काही ठिकाणी अति उष्णता पाहायला मिळेल.

Weather Update
मुस्लिम मनसैनिकांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; भोंग्याच्या भूमिकेमुळे नाराज

पुण्यात काय स्थिती?

पुण्यातही सापेक्ष आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. रविवारी मुंबईमध्ये सापेक्ष आर्द्रता दिवसभर ५५ टक्क्यांच्या आसपास होती. तर, सोमवारी त्यात वाढ होऊन ती ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचली. पुढील दोन दिवस संध्याकाळनंतर पुण्यात ढगाळलेले आभाळ असू शकेल. वाढलेले तापमान आणि ढगाळ आभाळ यामुळे उकाड्याचे प्रमाण अधिक वाढलेले जाणवण्याचीही शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.