Weather Update : पावसाचा हायअलर्ट! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात आज राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाता अंदाज आहे. पालघर आणि ठाणे वगळता राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateEsakal
Updated on

राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाले आहे. राज्यात आज राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाता अंदाज आहे. पालघर आणि ठाणे वगळता राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात आज (ता. १६) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra Weather Update
Chandrashekhar Bawankule : ‘वक्फ’च्या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अपेक्षा

तर येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार!

दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिक्कीम आणि परिसरात हाहाकार उडाला आहे. एकाच रात्री सुमारे २२० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.

Maharashtra Weather Update
Pune Porshe Accident: मुलाला जामीन मंजूर करताना झाल्या पुष्कळ चुका, समितीचा अहवाल सादर

तिस्ता नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खोल दरीतून वाहणारी नदी आता रस्त्याच्या पातळीवर आल्याने त्याची तीव्रता लक्षात येते. काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. आतापर्यंत विविध घटनांत नऊ जणांचा मृत्यू झाला असून १२००-१४०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. पश्‍चिम बंगाल सरकारच्या वतीने हेल्प डेस्क सुरू करण्यात आला.

Maharashtra Weather Update
Hijab Ban: "ड्रेस कोडच्या नावाखाली..." हिजाब बंदीविरोधात मुंबईतील 9 मुलींनी महाविद्यालयाला खेचले हायकोर्टात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.