Weather Update : हायअलर्ट! पुढील काही तास महत्त्वाचे; या ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे. अशातच आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
weather update 24 june heavy rainfall alert in maharashtra
weather update 24 june heavy rainfall alert in maharashtra Esakal

राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे. अशातच आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यामध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छ, संभाजीनगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

weather update 24 june heavy rainfall alert in maharashtra
जिल्ह्यातील ‘या’ 5 मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा! लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या पक्षांतरामुळे महाविकास आघाडीसमोर मोहोळ, दक्षिण सोलापूर, करमाळ्याचा पेच

राज्यात कुठे-कुठे पावसाची शक्यता?

आजपासून मुंबई, पुणे, ठाणे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली. परिणामी अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.

weather update 24 june heavy rainfall alert in maharashtra
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाचवीतील अथर्वची कमाल, लिहिली गोष्टीची दोन पुस्तके! चिमुकल्याने लिहिले सीईओंना पत्र, सीईओ म्हणाल्या, शाळेला नक्की भेट देईन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com