Weather Update : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; कोकण किनारपट्टीसह 'या' भागामध्ये मेघगर्जनेसह वरुणराजा बरसणार

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यामधून मान्सूनने परतण्यास सुरूवात केली आहे
Weather update
Weather update sakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यामधून मान्सूनने परतण्यास सुरूवात केली आहे, काही राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह कर्नाटक या भागांमध्ये विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण परिसरात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा कडाका सुरू होणार आहे.

Weather update
October Heat : राज्यात ऑक्टोबर हिटचे चटके! ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने 16 ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, या भागातही मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather update
Ratnagiri : कोकणाला मुसळधार पावसासह वादळाचा मोठा फटका; हर्णै बंदरातील उलाढाल ठप्प, मासेमारी थांबल्याने करोडोंचं नुकसान

दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासूनच थंडी जाणवू लागली असली तरी दिवसा कडक उन्हामुळे उष्णता जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये सोमवार आणि मंगळवारी पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान 32 अंशांपर्यंत तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

Weather update
Weather Update: राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या उघडिपीमुळे उन्हाचा ताप वाढला; मुंबई-पुण्यात पावसाची काय स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.