Weather Update : निम्मा महाराष्ट्र गारठला! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद; पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार

मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे थंडीने गारठले आहेत.
cold wave
cold waveesakal
Updated on

पुणे : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे थंडीने गारठले आहेत. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून, पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे मंगळवारी वर्तविण्यात आला.

निफाड येथे नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

मध्य महाराष्ट्रातील प्रमुख दहा पैकी पाच शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला होता. पुणे, नगर, जळगाव, सातारा, सोलापूर या शहरांचा त्यात समावेश होतो. संध्याकाळनंतर हुडहुडी भरविणारी थंडी पडत आहे.

cold wave
Ram Kit for Heart Attack : फक्त सात रुपयांत वाचणार हृदयरुग्णांचा जीव! रुग्णांसाठी 'राम किट' ठरणार वरदान

निम्मा महाराष्ट्र गारठला!

कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडी वाजत आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेकोट्या पेटल्या आहेत.

उत्तरेत थंडीची लाट

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, मंगळवारी (ता. १६) हरियानाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतात धुक्याचे साम्राज्य कायम आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीसह उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

cold wave
Uddhav Thackeray: शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

का वाढला गारठा?

पंजाब ते अरुणाचल प्रदेशपर्यंत दाट धुके पसरले आहे.

उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वहात आहेत.

आकाश निरभ्र असल्याने गारठा वाढला.

हवामान अंदाज

राज्यात किमान तापमानातील घट कायम राहून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.