राज्यात एक टक्काच पेरणी

पाऊस लांबल्याचा परिणाम : बळीराजाची तिफण गोठ्यात; अठरा जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस
weather update effect of prolonged rain one per cent sowing in the state agriculture solapur
weather update effect of prolonged rain one per cent sowing in the state agriculture solapur sakal
Updated on

सोलापूर : बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्के) पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृणधान्याखालील क्षेत्र ३६ लाख ३७ हजार हेक्टरपर्यंत आहे. तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र ४१ लाख ५८ हजार हेक्टर तर कापसाचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टरपर्यंत आहे.

मॉन्सूनच्या पावसाला ७ जूनपासून सुरवात होते, असे गृहित धरले जाते. त्यानुसार जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने १७ जूनपर्यंत केवळ एक टक्का क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. उजनी धरणासह राज्यातील बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत सरासरी १२०.४ मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात ९० मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. आता पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही, अशी स्थिती आहे.

जूनमध्ये कमी पाऊस पडलेले जिल्हे

नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत पेरणी खोळंबली आहे.

जमिनीत किमान ७५ मिलिमीटर ओलावा असल्याशिवाय शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणीची घाई करू नये. पावसाची वाट पाहावी. तोपर्यंत जमिनीची मशागत करून घ्यावी

- बाळासाहेब शिंदे, कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()