गुजरातमध्ये तुफान पावसानंतर भीषण पूर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान महाराष्ट्रात देखील येत्या चार ते पाच दिवसात अनेक जिल्ह्यात मुसळाधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने केला आहे. या अंदाजानुसार येत्या काही दिवसात विदर्भ, मराठवाडा यासोबत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर पाहायला मिळेल असे सांगण्यात आले आहे.