Rain Update
Rain Update

Rain Update: मुंबईसह 16 जिल्ह्यात पुढील 48 तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता; येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: येत्या ४८ तासांत मुंबईसह जवळच्या परिसरात हवामान ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल.
Published on

Weather Update: मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस पडला. याशिवाय रायगड, पालघर आणि ठाण्यामध्ये चांगला पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत मुंबईसह जवळच्या परिसरात हवामान ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भामध्ये विजांसह ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध भागामध्ये पाऊस पडला आहे. मुंबईमध्ये मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. कुलाबामध्ये २४.४ डिग्री सेल्सियन तापमान नोंदवण्यात आले आहे. सांताक्रूझ येथे २५.५ डिग्री तापमान नोंदवण्यात आले. कुलाब्यात ५५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Rain Update
Pune Rain : पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

शहरासह इतर भागात बुधवारी थंड हवा अनुभवायला मिळाली. पुढच्या ४८ तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर रायगडसह इतर १६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. किनारी भागामध्ये जोराचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समूद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Rain Update
Mahabaleshwar Rain : दुष्काळाशी झुंज देणाऱ्या 'या' तालुक्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस; पंधरवड्यात 332 टक्के पर्जन्यमान

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०°C आणि २५°C च्या आसपास असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.